आजपर्यंत १ लाख ३५ हजार ४३ जण कोरोनामुक्त; सक्रीय रूग्णसंख्या २१ हजारांवर
Satara News : सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या २०५३ नागरिकांना आज दिवसभरात घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
काही वेळा दररोजच्या बाधित रूग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या जास्त असते. परंतु त्यानंतर बाधितांच्या मोठ्या लाटा धडकत असल्याने सक्रीय रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. आजही बाधित रूग्णंख्या जास्तच निघाल्याने सक्रीय रूग्णसंख्येत वाढ झाली आहे. आता ही संख्या २१ हजारांच्या वर गेली आहे. म्हणूनच ही चिंताजनक बाब आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ७५०५३३
- एकूण बाधित - १६०५५४
- घरी सोडण्यात आलेले - १३५०४३
- मृत्यू - ३५९२
- उपचारार्थ रुग्ण - २१८१९
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या