कामावरून सुटून घरी निघालेल्या कामगाराने अनुभवले थरारनाट्य
Satara News : सातारा येथील एका कंपनीतून कामावरून सुटल्यानंतर घरी निघालेल्या युवकास पोवई नाक्यावर तहसील कार्यालयासमोर त्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक देवून पुन्हा त्याचाच पाठलाग करत करंजे नाका परिसरात या युवकाला दोन मद्यधुंद युवकांनी मारहाण केल्याची घटना घडली.
अक्षय सुभाष चोरगे (रा. कोंडवे, सातारा) हा युवक सातारा येथील एका कंपनीत नोकरीला आहे. कामावरून सुटल्यानंतर तो गावाकडे निघाला असताना पोवई नाक्यावर तहसील कार्यालयानजीक पेट्रोल पंपानजीक त्याला पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या युवकांच्या दुचाकीने धडक दिली. यामध्ये तो पडला. मद्यधुंद अवस्थेतील दोन युवक त्यालाच शिवीगाळ करू लागल्याने त्याने तेथून जाणे पसंत केले.
पोलीस जाताच भिरकावला दगड
तो त्याच्या दुचाकीवरून करंजे नाका परिसरात पोहोचत असताना पाठीमागून पुन्हा भरधाव वेगाने ते मद्यधुंद दोन युवक दुचाकीवरून आले. त्यांनी अक्षयला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अक्षय परिसरात असलेल्या पोलिसांकडे मदतीसाठी धावत गेला. त्यावेळी दोन पोलीस कर्मचारी तिथे होते. त्यांना पाहताच त्या दोन युवकांनी पळ काढला. अक्षय या प्रकाराने घाबरून गेला होता. पोलीस कर्मचारी जाताच त्याच युवकांनी त्याला दगड फेकून मारला आणि तेथून ते पळून गेले. या प्रकाराने घाबरलेल्या अक्षयने घरच्यांना फोनवरून हा प्रकार सांगितल्यावर त्याच्यासह सगळे शाहूपुरी पोलीस ठाण्यात गेले. दुचाकीने मूळ धडक देण्याचा व मारहाणीचा पहिला प्रकार पेट्रोल पंपासमोर घडला असल्याने त्याला शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगण्यात आले.
बेधुंद युवकांना धडा शिकवा !
लॉकडाऊन सुरू असल्याने काही युवक व्यसनात गुंतले आहेत. हे बिघडलेले युवक मद्यप्राशन करून मोकळ्या रस्त्यावरून धूम स्टाईल गाड्या चालवत आहेत. अशा युवकांना त्यांच्या घरच्यांनी आवरण्याची गरज असून अशाप्रकारे एखाद्या युवकाला काहीही कारण नसताना मारहाण करणाऱ्या युवकांना पोलिसांनी धडा शिकवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या