Solapur News : माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना पत्नीवियोग


शाहू परिवार व महात्मा फुले सूत गिरणी परिवारावर शोककळा

Solapur News : मोहोळचे माजी आमदार तथा माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा (वय ५८) यांचे आज पहाटे पुणे येथील एका रुग्णालयात हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 

‘सावली’ वुमेन्स फाउंडेशनच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या पश्चात पती माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, मुलगा अभिजीत ढोबळे, सून शारोन अभिजीत ढोबळे, दोन मुली क्रांती आवळे व कोमल साळुंखे तसेच जावई अब्राहम आवळे, अजय साळुंखे व नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

अनुराधा ढोबळे या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने शाहू परिवार व महात्मा फुले सूत गिरणी परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या