Dhangar Reservation News : हेमंत पाटील यांची शनिवारपासून ‘गावकुस यात्रा’


धनगर आरक्षण, समाजाच्या ऐक्यासाठी बारामती येथून यात्रेचा शुभारंभ

Dhangar Reservation News : धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी आणि महाराष्ट्रातील धनगर समाजबांधव, समाजाचे नेते, संघटना यांच्यामध्ये एकी निर्माण व्हावी यासाठी धनगर समाज एकीकरण कमिटीचे अध्यक्ष व इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील हे ‘गावकुस यात्रा’ करणार आहेत. शनिवारी (दि. २६) बारामतीपासून या यात्रेची सुरुवात होणार आहे.

धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी धनगर समाजाचे नेते हेमंत पाटील यांनी भाजप सत्तेत असताना २५४ जनआंदोलने केली होती. विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानीही आंदोलन केले होते.

समाज एकत्र करण्यासाठी प्रयत्नशील 

हेमंत पाटील यांनी पुणे येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्या अडवून जाब विचारला होता. आणि अशा प्रकारची आंदोलने केली म्हणून ते ९ वेळा जेलमध्येही गेले होते. धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ते मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. महाराष्ट्रातील धनगर समाज एकत्र करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. 

याचसाठी ते गावकुस यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरणार आहेत. बारामतीपासून सुरू होत असलेली ही ‘गावकुस यात्रा’ पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, मराठवाडा करत विदर्भात पोहोचणार असल्याची माहिती हेमंत पाटील यांनी दिली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या