Mahavitaran News : पडिक जमिनीतून मिळणार वार्षिक ३० हजार


महावितरणच्या सौर कृषी वाहिनी योजनेतून प्रतिएकर उत्पन्न मिळवण्याची संधी

Mahavitaran News : राज्य शासनाच्या सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे शेतीसाठी कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाटी २ ते १० मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पांसाठी महावितरणकडून ३ ते ५० एकरांपर्यंत जागा भाडेतत्वावर घेण्यात येत असून जमीनधारकांना प्रतिएकर ३० हजार रुपये वार्षिक भाडे व त्यात दरवर्षी ३ टक्के वाढ देण्यात येणार आहे. पुणे प्रादेशिक विभागात या प्रकल्पांसाठी आतापर्यंत ५५ अर्जांद्वारे ८३९ एकर जमिनींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

यामुळे शेतकऱ्यांसह खासगी जमीनधारक किंवा समूह तसेच सहकारी संस्था, साखर कारखाने, स्थानिक स्वराज्य संस्था, निमशासकीय संस्था आदिंना निश्चित वार्षिक उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या संकल्पनेतील कृषीपंप वीज धोरण २०२० मध्ये कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी वेग देण्यात आला आहे. या प्रकल्पांसाठी स्वत: शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, सहकारी संस्था, साखर कारखाने, जलउपसा केंद्र तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध संस्था, कंपन्या, महामंडळ, सार्वजनिक उपक्रम, प्रशासकीय संस्था, नागरी व स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे (महसूल विभागाच्या मालकीची व ताब्यातील जमीन वगळून) आदिंच्या मालकीच्या जमिनी २७ ते ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. त्यासाठी महावितरणकडून प्रतिएकर ३० हजार रुपये वार्षिक भाडेपट्टी व दरवर्षी ३ टक्के वाढ देण्यात येणार आहे.

८३९ एकर जमिनींचे प्रस्ताव

याकामी महावितरणच्या ३३ / ११ केव्ही उपकेंद्रांच्या ५ किलोमीटर परिघातील जमिनी घेण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. सोबतच महसूल विभागाच्या मालकीच्या व ताब्यातील जागा नाममात्र एक रुपया भाडेतत्त्वावर ३० वर्षांसाठी अधिग्रहित करण्यात येणार आहेत. सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी पुणे जिल्हा - २८६, कोल्हापूर - १२९, सांगली - १४०, सातारा - ८१ आणि सोलापूर जिल्ह्यातील २६१ अशा एकूण ८९७ उपकेंद्रांची यादी जाहीर केली आहे. या उपकेंद्रांची यादी, योजनेची संपूर्ण माहिती, अर्ज व इतर प्रक्रियेची सोय https://mahadiscom.in/solar-mskvy/index_mr.html या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. आतापर्यंत या प्रकल्पांसाठी पुणे प्रादेशिक विभागात ५५ अर्जांद्वारे ८३९ एकर जमिनीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यात सोलापूर जिल्हा - ३४ अर्जांद्वारे ४३४ एकर, कोल्हापूर - ४ अर्जांद्वारे १६१ एकर, सातारा - ४ अर्जांद्वारे १०७ एकर, पुणे जिल्ह्यातून १० अर्जांद्वारे ८७ एकर जमिनीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावांवर महावितरणकडून कार्यवाही सुरु आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या