सातारा जिल्हा महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी
OBC Reservation News : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने त्वरित कार्यवाही करावी, अशा मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीचे निवेदन जिल्हा महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाNयांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पंचायत राज संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकांमधील ओबीसींसाठी राखीव असलेल्या जवळपास ५६ हजार जागांवर याचा परिणाम होत आहे. वास्तविक मंडल आयोग, ७३ आणि ७४ व्या घटना दुरुस्तीने ओबीसींना विविध पातळींवर आरक्षण दिले आहे. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण कायदेशीर असून त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे.
ओबीसींच्या आरक्षणाचे रक्षण व्हावे
ओबीसी प्रवर्गातील वंचित जनसमुहांना लोकशाही प्रक्रियेत पंचायत राज संस्थांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने त्वरित कार्यवाही करुन ओबीसींच्या हक्काच्या २७ टक्के आरक्षणाचे रक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या