राजधानी सातारा येथे जलमंदिरात शिवराज्याभिषेकदिन अपूर्व उत्साहात साजरा
Rajyabhishekdin News : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ही देशाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. ६ जून १६७४ साली महाराजांनी केलेल्या विधियुक्त राज्याभिषेकाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. या राज्याभिषेकामुळे महाराजांनी स्थापन केलेल्या राज्यास कायदेशीर बैठक प्राप्त झाली. त्यामुळे शिवराज्याभिषेक हा देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन असल्याचे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राजधानी सातारा येथे जलमंदिर या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्याभिषेक ही संपूर्ण देशात लोकशाही राज्याची संकल्पना साकारणारी घटना होती. महाराजांनी वयाच्या १५ व्या वर्षी स्वराज्याचा विचार करून तो प्रत्यक्षात साकारणे हे एक अलौकिक कार्य होते. त्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन झाली, असे आपण मानतो. त्यामुळेच पावणे चारशे वर्षे झाली तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वत्र अधिराज्य करीत आहे. कारण महाराजांनी जे राज्य उभे केले ते रयतेसाठीच, असे ते म्हणाले.
संभाजीराजे हे आमचे धाकटे बंधू - उदयनराजे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करण्याची वेळ येते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला. मराठा समाजातील लोक लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे उद्या उद्रेक झाला तर त्यासाठी राज्यकर्ते जबाबदार असतील. पक्ष कोणता का असेना मराठा आरक्षणासाठी आता अधिवेशन बोलावण्याची गरज आहे. 'दूध का दूध, पानी का पानी' झालेच पाहिजे, असे उदयनराजे यांनी म्हटले. आरक्षण हे वेगवेगळ्या जातींना जीआर काढून देण्यात आले, कोणाचे काढून न घेता आरक्षण द्या, मराठा समाजाबाबत भेदभाव का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गायकवाड समितीच्या अहवालाचे व्यवस्थित वाचन झाले नाही, झाले असते तर सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला नसता, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या