हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला अजितदादा पवार यांची ग्वाही
Reservation News : धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महाविकास आघाडीचे सरकार हे आपले सरकार असून कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असल्याचे धनगर समाज एकीकरण कमिटीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सांगितले.
धनगर समाज एकीकरण कमिटीचे अध्यक्ष हेमंत पाटील व शिष्टमंडळाने नुकतीच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार यांनी धनगर आरक्षणासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे पाटील यांनी सांगितले. काही दिवसातच कायदेतज्ञांशी चर्चा करून आपला हा विषय मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन पवार यांनी दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
याचिकेवर जुलैमध्ये सुनावणी शक्य
धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपण उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी जुलै २०२१ मध्ये येण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी आपण महाराष्ट्रातील धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी धनगर समाजाचा अनुसुचित जमातीत समावेश करण्यासाठी आणि आरक्षण मिळून देण्यासाठी वकील व संबंधित अधिकारी यांची बैठक आयोजित करून या विषयाला गती देणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.
धनगर व धनगड एकच असून महाराष्ट्रातील धनगर समाज हा एसटीमध्ये मोडत आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या