Sangli News : वृक्षसंवर्धनाचे महत्त्व युवा पिढीला समजावे - खलिपे


पर्यावरण दिनानिमित्त रूद्राक्षा फौंडेशनच्या सदस्यांनी घेतली पर्यावरण रक्षणा
ची शपथ

Sangli News : पर्यावरणाची हानी ही माणसांच्या हस्तक्षेपामुळे झालेली आहे. त्यामुळे आज आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अजूनही आपल्यात काही बदल नाही झाला, तर जग विनाशाकडे जाईल. म्हणून युवा पिढीला पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे असल्याचे विचार रुद्राक्षा र्फौडेशनच्या संस्थापक अध्यक्ष अश्विनी खलिपे यांनी ऑनलाइन मिटिंगच्या माध्यमातून मांडले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फौंडेशनच्या सदस्यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन पर्यावरण वाचवण्याचा वसा घेतला. यावेळी अगदी लहानांपासून युवा वर्गापर्यंत सर्वांनी झाडांना पाणी घालून वृक्षसंवर्धनाचे काम सुरू केले तसेच वृक्षारोपणही केले. यानिमित्ताने आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सांगली, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यामधील सदस्य या उपक्रमात ऑनलाइन सहभागी झाले होते.

पर्यावरण रक्षणाकडे गांभिर्याने पहा

कोरोनाच्या या महामारीच्या काळात देशावर खूप मोठे संकट कोसळले आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे पर्यावरण रक्षणाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे खलिपे यांनी सांगितले.

या उपक्रमात अश्विनी खलिपे, ईश्वरी यादव, पूर्वा यादव, हर्ष डोंगरे, आयुष शिंदे, सोनाली माने, योगिता जाधव, सागर यशवंत, पूनम देवकर, पल्लवी मोहिते, आयेशा लोहोरा, इंद्रनील खलिपे, हरुबाई यशवंत, विजयालक्ष्मी यशवंत, भारती यशवंत, सोहम यशवंत, राजवीर मोहिते, सानिका मोहिते, सुप्रिया खाडे आदिंनी सहभाग नोंदवला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या