लोकसेवेचा वारसा जपत कर्तृत्वाचा ठसा उमटवलेले व्यक्तिमत्त्व
वसा लोकसेवेचा, वारसा विचारांचा आणि ठसा कर्तृत्वाचा या त्रिसुत्रीमुळे सातारा जिल्ह्याचा अभिमान, स्वाभिमान व कर्तुत्वाची उंच कमान अशी ख्याती मिळवलेले व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्र वाहतूक सेना (महासंघ) जिल्हाप्रमुख व फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख मा. संभाजीराव जगताप. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा संघर्ष नेहमीच सुरु असतो. अशा या लढवय्या नेत्याचा आज ६० वा वाढदिवस त्यानिमित्त...
कुठलेही राजकीय पाठबळ आणि वारसा नसताना आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आपण आहात आमच्या श्वासात आणि आमच्या मनात हे शिरसावंद्य मानून मा. संभाजीराव जगताप यांनी स्वतःबरोबरच जनतेच्या तनामनात शिवसेनेचे आचार-विचार रुजविले.
पक्षप्रमुखांचा विश्वास सार्थ ठरवला
पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी हीच त्यांच्यातील तळमळ ओळखून त्यांच्यावर महाराष्ट्र वाहतूक सेना (महासंघ) जिल्हाप्रमुख व फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख अशी जबाबदारी सोपवली. मराठी बाणा आणि शिवप्रेम ओतप्रोत भरलेल्या मा. संभाजीराव जगताप यांनी आपल्या चाणाक्ष बुध्दीने व लढवय्येगिरीने सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या भूमिकेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास सार्थ ठरवला.
'फक्त लढ म्हणा' हीच अपेक्षा
उद्धवसाहेब आपण ताकद दिलीच आहे. आता जनतेतून ताकद मिळविण्यासाठी 'पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा' अशीच तमाम शिवसैनिकांची अपेक्षा आहे. मा. संभाजीराव जगताप यांनी महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाचे उदयजी दळवी, माजी पालकमंत्री विजयबापू शिवतारे व शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे - पाटील यांच्या माध्यमातून 'शिवसेना बोलून नाही, तर करुनच दाखविते' या ब्रीद वाक्यप्रमाणे कोट्यवधीची विकासकामे साकारली. गावोगावच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
अनेक वर्ष वाहतुकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी अविरतपणे झटणारे मा. संभाजीराव जगताप हे आपल्या सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन वेगवेगळ्या चळवळी उभ्या करणारे नेतृत्व आहे. मा. उध्दवसाहेब ठाकरे यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून विकास कामे आणण्यासाठी व सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी अविरतपणे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या योजनांसाठी कोट्यवधीचा निधी मिळाला आहे.
सर्वसामान्यांचे कैवारी
पिराचीवाडी (ता. फलटण, जि. सातारा) या गावातून उदयास आलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. एका शेतकरी घरात वारसा लाभलेल्या कुटुंबात १ जून १९६० रोजी त्यांचा जन्म झाला. आई, वडिलांचे संस्कार जपत त्यांचे संघटन कौशल्य बहरत गेल्याने सर्वसामान्यांचे कैवारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. शिवसैनिकांच्या हाकेला तात्काळ साद घालण्याचा त्यांचा गुण इतरांसाठी
नेहमीच आदर्शवत राहिला आहे. त्याचबरोबर इतर सामाजिक कार्य करताना संभाजी दादांनी ग्रामीण भागात एसटीची सुविधा, रक्तदान शिबिरे, रस्त्यांसाठी प्रयत्न करून ते मार्गी लावले. सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान, आमचा अभिमान व कर्तुत्वाची उंच कमान आमचे लाडके नेते मा. संभाजीराव जगताप यांना सातारा जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक शिवमावळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा !
शब्दाकन : मुकुंदराज काकडे
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या