सातारच्या कैलास स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना बालाजी ट्रस्टची मानवंदना
Satara News : संगम माहुली (सातारा) येथील कैलास स्मशानभूमीत कोरोना काळात अंत्यसंस्कारांसाठी प्रचंड प्रमाणात कोविड व नॉनकोविडचे मृतदेह येत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येत आहे. त्यांचे हे योगदान पाहता त्यांना कोविडच्या काळात पगाराव्यतिरिक्त ५० टक्के ज्यादा मानधन देण्यास ट्रस्टने सुरूवात केली आहे.
सातारा येथील श्री बालाजी ट्रस्टच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून संगम माहुली येथे कृष्णातीरी उभारलेल्या कैलास स्मशानभूमीला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजपर्यंत या स्मशानभूमीत २४ हजार ३०० अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यामध्ये कोविडचे २९५० अंत्यसंस्कार आहेत.
जीवावर उदार होऊन सेवा
स्मशानभूमीतील कर्मचारी जीवावर उदार होऊन अत्यंत प्रामाणिकपणे नम्रपणे सेवा देत आहेत. यासाठी या सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने लसीकरण केले आहे. तसेच बालाजी ट्रस्टतर्फे त्या सर्वांना सुरक्षिततेसाठी सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. परंतु त्यांचे योगदान पाहता त्यांना कोविडच्या काळात पगाराव्यतिरिक्त ५० टक्के ज्यादा मानधन देण्यास ट्रस्टने सुरूवात केली आहे.
आजपर्यंत वाचली ३० हजार झाडे
नॉनकोविडचे अंत्यसंस्कार हे शेणीत केले जातात. त्यामुळे आजपर्यंत ३० हजार झाडे वाचली असून बचत गटाच्या १११ महिलांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या