Satara News : साताऱ्यात लाखो रूपयांचे लोखंडी साहित्य जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; चोरीचा माल असल्याचा संशय

Satara News : सातारा शहरानजीक देगाव फाट्याजवळ जावेद मौला शेख (वय ४३, रा. अहिरे कॉलनी, देगाव फाटा, सातारा) याच्याकडून ट्रक व लोखंडी कास्टिंगचे जॉब असे नऊ लाख ३१ हजारांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जावेद शेखकडे लोखंडी साहित्य असल्याचे समजल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिरे कॉलनीत छापा टाकला. त्यावेळी शेखकडे १४२.७५ किलो लोखंडी कास्टिंगचे जॉब, लोखंडी कास्टिंगच्या लायनर पाइप, ४३.८ किलोचे रॉड, लोखंडाचा किस असे साहित्य आढळले. याबाबतच्या प्रश्नांना शेखने समाधानकारक उत्तरे न दिल्याने हे साहित्य चोरीचे असल्याचा संशय पोलिसांना आला. हवालदार जाधव तपास करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या