Satara News : गटशिक्षणाधिकाऱ्यांनी विनयभंग केल्याची तक्रार


शैक्षणिक क्षेत्रात खळबळ; संपूर्ण प्रकरणाची विशाखा समितीमार्फत चौकशी - कोळेकर

Satara News : सातारा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मानसिक छळ करुन त्रास दिल्याची तसेच विनयभंग केल्याची तक्रार एका शिक्षिकेने केल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत विभागीय शिक्षण आयुक्तांसह जिल्हा परिषदेकडे निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी या शिक्षिकेने केली आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी विशाखा समितीमार्फत सुरु असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.

सातारा तालुक्यातील एक उपशिक्षिका महामार्गालगतच्या एका शाळेत कार्यरत आहे. या शिक्षिकेने लेखी निवेदन आयुक्तांना दिले असून त्यामध्ये गटशिक्षणाधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शाळेत रूजू झाल्यापासून गटशिक्षणाधिकाऱ्यांचा मला त्रास सुरु झाला आहे. पंचायत समितीमध्ये बोलावून कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. माझ्या पतीचे निधन झालेले असताना तुमचे मिस्टर कुठे असतात, तुमची बदली करु का, कोंढवलीला जाता का? चिंचणेरला येता का? असे प्रश्न विचारुन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मानसिक खच्चीकरण केले.

‘जवळ’ या ‘चिंतामुक्त’ व्हा ! 

३१ जानेवारी २०२० रोजी मुख्याध्यापक सातारला कामानिमित्त गेल्या असता गटशिक्षणाधिकारी अचानक दुपारी शाळेवर आले. त्यांनी विद्यार्थ्यांची चौकशी न करता यंदा पाऊस जास्त झाला आहे. ऊसाला तुरे आले आहेत, असे खोचक शब्दप्रयोग करत एकटक पाहू लागले. शाळा सुटल्यानंतर चारचाकीने घरी सोडतो असा आग्रह धरु लागले. दि. १० जून २०२० व १७ जून २०२० रोजी ते माझ्या घरी आले. माझ्या मुलीला बाहेर पाठवून, 'सर्व तक्रारी मी निकालात काढणार आहे. तुला त्याचा काहीही त्रास होऊ देणार नाही. परंतु मी तुझ्यावर दया म्हणून शरीरसुखाची अपेक्षा करत आहे. त्यासाठी आपण दोघे एकमेकाच्या जवळ येवू. तु नकार देवू नकोस. आपण जवळ आलो तर तुला शाळेत कसलाही त्रास होणार नाही', असे म्हणत त्यांनी विनयभंग केल्याचे शिक्षिकेने तक्रारीत म्हटले आहे.

शिक्षण सभापतींनी घेतली दखल 

नोटिसा काढून शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांमार्फत माझी चौकशी करण्यात आली. कोरोना काळात वर्गातील मुलांची तपासणी घेवून शैक्षणिक कामाबाबत नाचक्की करण्याचा प्रयत्न केला. तसेच माझ्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्जही केल्याचे निवेदनात म्हटले आहे. संबंधित शिक्षिकेचा तक्रारी अर्ज प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाला आहे. चौकशी करुन अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाणार असल्याचे गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी सांगितले. 

दरम्यान, या प्रकाराबाबत जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्याकडून माहिती जाणून घेतली. संबंधित शिक्षिकेने केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यातून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. जर त्यामध्ये गटशिक्षणाधिकारी दोषी आढळले तर त्यांना शासन झालेच पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या