Satara News : कोरोना टेस्टचा रिपोर्ट २४ तासात देणे बंधनकारक


नियम न पाळणाऱ्या लॅबची मान्यता रद्द करून फौजदारी गुन्हे दाखल करणार

Satara News : कोरोना टेस्टिंग करणाऱ्या जिल्ह्यातील लॅबनी तपासणीचे अहवाल २४ तासाच्या आत आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय यंत्रणेस (तालुका आरोग्य अधिकारी) ईमेल किंवा व्हॉटसअपद्वारे कळविणे बंधनकारक आहे. हा नियम न पाळणाऱ्या लॅबची मान्यता रद्द करणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी म्हटले आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवीन रुग्णांचे निदान लवकर होणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य उपचार वेळेत होऊन मृत्युच्या संख्येत घट होण्यासाठी रॅट टेस्टिंग तसेच आरटीपीसीआर टेस्टिंगची भूमिका महत्त्वाची असणार आहे. यादृष्टीने टेस्टिंग करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अशा सर्व रुग्णांची नोंद ऑनलाइन पोर्टलवर तात्काळ भरण्यात यावी. जेणेकरुन मिळणाऱ्या अहवालावरुन योग्य ती उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पोर्टलवर माहिती भरण्यासंदर्भात सूचना

संशयित रुग्णांचा नमुना तपासणीसाठी घेतल्यानंतर ऑनलाइन पोर्टलवर नोंद करताना आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुना घेते वेळेस एसआरएफ आयडीवर त्याचा संपूर्ण पत्ता सध्या वास्तव्य करीत असलेला (जिल्ह्याबाहेरील असेल तर) किंवा आधारकार्डवर असलेला पत्ता प्रमाणित करुन नमूद करण्यात यावा. संपूर्ण पत्ता नमूद केला तरच पॉझिटिव्ह रुग्णाचा व संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन उपाययोजना राबविण्यास जिल्हा प्रशासनास सोयिस्कर होईल. तसेच रुग्णांचा सुरु असलेला मोबाईल नंबर लिहिण्यात यावा तसेच मिस्ड कॉल देऊन प्रत्यक्ष रुग्णाचा मोबाईल नंबर आहे का याची खात्री करुन घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाचा अहवाल देतेवेळी ऑनलाईन पोर्टलवर नोंद करुन आयसीएमआर नंबरसहित तात्काळ देण्यात यावा. फॅसेलिटी अ‍ॅपमध्ये ऑटकम अपडेशन (डिस्चार्ज, डेथ, रेफर) करत्यावेळेस आसीएमआर नंबरशिवाय अपडेट करता येत नाही, याची नोंद घ्यावी. तसेच रुग्णांचा अहवाल देतेवेळेस ज्या नावाने आपल्या चाचणी केंद्रास परवानगी दिलेली आहे, त्याच लेटर हेडवर संबंधितास अहवाल देण्यात यावा.

क्लाऊड पॅथॉलॉजी सॉफ्टवेअर वापरा

शक्य झाल्यास त्यांचा नमुना तपासणीचा अहवाल मोबाईलवर अ‍ॅटोमॅटिक मॅसेज जाण्यासाठी क्लाऊड पॅथॉलॉजी या सॉफ्टवेअरचा वापर करावा. या सर्व सूचनांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा लॅबची मान्यता पूर्णपणे रद्द करण्यात येईल व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या