सुधारित आदेश जारी; ११ ते २ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील क्षेत्रासाठी सुविधा
Satara News : कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्ह्यातील कडक लॉकडाऊनला दि. ८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तथापि, बँविंâग सेवेअभावी अत्यावश्यक सेवा प्रभावित होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह सुधारित आदेश जारी केले आहेत.
सुधारित आदेशानुसार फक्त शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने पीक कर्जाचे कामकाज, खते, बी -बियाणे, शेती औजारे यांची दुकाने, गॅस एजन्सीज, पेट्रोल पंप, मेडीकल यांचे रोख व्यवहार इत्यादी कामकाज, एटीएममध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स, डाटा सेंट ही कामे करण्यासाठी बँका कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत सुरू राहतील.
तसेच या बँकांचे उर्वरित सर्व कामकाज पूर्णपणे बंद राहील. या ठिकाणी गर्दी होणार नाही तसेच कारोनाच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची जबाबदारी संबंधित बँक व्यवस्थापक यांची राहील, असे या आदेशात म्हटले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या