एकाच कुटुंबातील १६ जण बाधित निघाल्याने कंंटेेेनमेेंट झोनही जैसे थे
Satara News : माण तालुक्यातील म्हसवड शहरात एकाच कुटुंबातील तब्बल १६ जण कोरोना बाधित आढळून आल्यामुळे शहरातील लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवला आहे, त्याचप्रमाणे कंंटेेेनमेेंट झोनही जैसे थे ठेवण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी दिली. कंंटेेेनमेेंट
म्हसवड शहर अनलॉक केल्यास शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी आपले कर्तव्य समजून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नगरपालिकेचा प्रस्ताव फेटाळला
म्हसवड शहर अनलॉक करण्याच्या मागणीसाठी दि. ८ रोजी काही व्यापारी व नगरसेवकांनी नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करून मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांना निवेदन दिले होते. त्यानुसार शहर आठवड्यात तीन दिवस अनलॉक करण्याचे नगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र दि. ८ रोजीच शहरातील एकाच कुटुंबातील १६ जण बाधित सापडल्याने प्रशासनाने नगरपालिकेने पाठवलेला अनलॉकचा प्रस्ताव फेटाळत शहरातील लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवला आहे.
आणखी थोडी कळ सोसा - डॉ. माने
सातारा जिल्हा लॉकडाऊन होण्यापूर्वीपासून म्हसवड शहरात लॉकडाऊन सुरु आहे. या काळात म्हसवडकर नागरिकांनी सूचनांचे पालन करुन नगरपालिका प्रशासनास सहकार्य केले आहे. म्हसवडकरांनी आणखी थोडी कळ सोसून काही दिवस नगरपालिकेला असेच सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या