Satara News : वाठार स्टेशननजीक वाकड्या पुलाला भगदाड


पूल लवकरात लवकर दुरूस्त करण्याची शिवसेना, वाहतुक सेनेची मागणी

Satara News : पंढरपूर ते पोलादपूर राज्य महामार्गावर कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशननजीक असलेल्या वाकड्या पुलाला भगदाड पडले असून संरक्षण कठडेही ढासळले असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा पूल लवकरात लवकर दुरुस्त केला जावा अशी मागणी शिवसेना, महाराष्ट्र वाहतूक सेना, पिंपोडे बुद्रुक ग्रामस्थ यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. 

तसे पाहिले तर दूरवरून लोक याच पुलावरून महाबळेश्वर, पाचगणी, पुणे, मुंबई या ठिकाणी जात असतात. उत्तर कोरेगाव तालुक्याला हा जोडला जाणारा महत्त्वाचा पूल आहे. या पुलाला पडलेल्या भगदाडामुळे हा वाकडा पूल केव्हाही पडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या पुलाच्या शेजारी ब्रिटिशकालीन पूल आहे. परंतु त्याची कालमर्यादा संपल्यामुळे २० - २५ वर्षांपूर्वी तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याशेजारी नवीन पूल बांधण्यात आला होता, परंतु हा पूल आता शेवटच्या घटका मोजताना दिसत आहे. अलीकडे सतत या ठिकाणी अपघाताची मालिका सुरू असुनही बांधकाम विभाग बघ्याच्या भूमिकेत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थ पुलावर

या पुलाकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष व लोकसभा अध्यक्ष संभाजीराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना, महाराष्ट्र वाहतूक सेना व पिंपोडे बुद्रुक ग्रामस्थ पुलावर जमले होते. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा उपप्रमुख विशाल जाधव, जिल्हा सल्लागार महेंद्र जगताप, ज्येष्ठ शिवसैनिक असिफ शेख, तालुकाप्रमुख निखिल गुरव, स्टँड प्रमुख अजित धोत्रे, शुभम जगदाळे, रोहित शिंदे, आदित्य कदम व शिवसैनिक उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या