Satara News : चालू शैक्षणिक वर्षात आरटीईअंतर्गत प्रवेश नाही


शासनाने फीचे पैसे थकवल्याने खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची भूमिका
 

Satara News : शासनाच्या आरटीई निकषानुसार खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. या विद्यार्थ्यांची फी शासनाने देणे बंधनकारक आहे. परंतु दोन - तीन वर्षांपासून साताऱ्यातील अनेक इंग्रजी शाळांचे कोट्यवधी रुपये शासनाने दिलेले नाहीत. त्यामुळे २०२१ - २२ या वर्षात आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही, अशी भूमिका खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा (ईसा) संघटनेने घेतली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी दिली.

याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. खासगी विनाअनुदानित शाळांना कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान अगर कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही. या शाळा संपूर्णपणे विद्यार्थ्यांच्या फी वर अवलंबून असतात आणि सातारामधील ९८ टक्के शाळा या बजेट स्कूल असून फक्त १५ हजारापासून २५ हजार वार्षिक फी आकारतात. 

लॉकडाऊनमुळे शिक्षण संस्था अडचणीत

लॉकडाऊनमुळे पालकांनी फी न दिल्याने शिक्षक, कर्मचारी यांचे पगार देणे, इमारत देखभाल, ऑनलाईन शिक्षणासाठी होणारा खर्च, शाळा उभारणी, दुरुस्ती, कर्जाचे हप्ते, टॅक्स, वीजबील या बाबींची पूर्तता होत नसल्याने शिक्षण संस्था अडचणीत आल्या आहेत. यामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. आरटीई अंतर्गत येणारे कोट्यवधी रुपये देण्यास शासनाने टाळाटाळ केली आहे. यामुळे नाइलाजास्तव निर्णय घेतला गेला आहे. जोपर्यंत आरटीईचे थकित पैसे मिळत नाहीत तोपर्यंत २०२१ - २२ मध्ये आरटीईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यासंदर्भात झालेल्या बैठकीस हिंदवी स्कूलचे अमित कुलकर्णी, यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक दशरथ सगरे, युनिव्हर्सल स्कूलचे नितीन माने, चॅलेंज अ‍ॅवॅâडमीचे दिलीप वेलवेट्टी, शानभाग स्कूलच्या आंचल शानभाग - घोरपडे, एसइएमएसच्या मिथाली गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या