पॉझिटिव्हिटी रेट आला दहाच्या खाली; तिसऱ्या स्तरात येण्याचा मार्ग दृष्टीपथात
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८३२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २९ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी दिली.
जून सुरू झाल्यापासून पावसाचा मोसम गतिमान झाला असून कोरोनाचा मोसम उतरणीला लागला आहे. मे मध्ये रोजची अडिच हजारावर गेलेली रूग्णसंख्या आता हजारच्या खाली आली असून पॉझिटिव्हिटी रेट दहाच्या खाली घसरून ८.३३ टक्केवर आला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा चौथ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात येण्याचा मार्ग सूकर झाला आहे. परिणामी निर्बंध आणखी थोडेसे शिथिल होण्याची आशा वाढली आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली २५ (८१३४), कराड २०४ (२४९२९), खंडाळा ३३ (११२७४), खटाव ९७ (१८३४१), कोरेगाव ५४ (१५७८८), माण ६६ (१२४४५), महाबळेश्वर २ (४१८२), पाटण ४२ (७७७१), फलटण ७६ (२७५८४), सातारा १९२ (३८१८३), वाई २९ (१२१७३) व इतर १२ (११९६) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ८२ हजार नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १ (१८५), कराड ४ (७३०), खंडाळा २ (१४६), खटाव ३ (४५५), कोरेगाव ५ (३६२), माण ०(२४५), महाबळेश्वर ० (४४), पाटण २ (१७४), फलटण ० (२७३), सातारा १२ (११६०), वाई ० (३२०) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४०९४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या