मानवाधिकार सुरक्षा परिषदेतर्फे तळबीड पोलीस ठाण्याला सॅनिटायझर, मास्क
Satara News : स्वत:चा जीव धोक्यात घालून आज सर्वत्र पोलीस, डॉक्टर्स, पत्रकार, आशा, अंगणवाडी सेविका, नर्स आदी फ्रंटलाईन वर्कर्स धाडसाने काम करीत आहेत. नागरिकांनी प्रशासनास व या कोरोना योध्यांना सहकार्य करावे, असे आवाहन तळबीड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांनी केले.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेचे डॉ. धनंजय खैर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना महामारीच्या काळातही संघटनेचे कार्य जोमाने सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेच्यावतीने तळबीड पोलीस स्टेशनला सॅनिटायझर, मास्क, हातमोजे देण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
कर्तव्यभावना रूजवणे गरजेचे
कोरोना योध्यांचा सन्मान करणे व शासनास सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे ही भावना रुजवण्यासाठी व समाजमनाची मशागत करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना तालुका उपाध्यक्ष प्रकाश शेलार यांनी व्यक्त केली. या उपक्रमास मसूर विभागप्रमुख सुनील ठोके व रामभाऊ पार्लेकर यांनी प्रोत्साहन देत सहकार्य केले.
यावेळी जनसंपर्क तालुकाप्रमुख राजेश शेलार, कोपर्डे हवेली विभागप्रमुख सागर भोसले, सेक्रेटरी धनंजय कुंभार आदी उपस्थित होते. कराड तालुका उपाध्यक्ष प्रकाश शेलार यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन तळबीड विभागप्रमुख विकास चव्हाण यांनी केले, तर फौजी बाजीराव चव्हाण यांनी आभार मानले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या