Satara News : ... अन्यथा ती कार खोल दरीत कोसळली असती


पसरणी घाटातील भयनाट्य; झाडाने वाट अडवल्याने तिघे बालंबाल बचावले

Satara News : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती या उक्तीचा पुरेपूर प्रत्यय आणून देणारी अंगावर काटा आणणारी थरारक घटना आज दुपारी चारच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील वाई ते पाचगणी मार्गावरील पसरणी घाटात घडली. वाईहून पाचगणीला निघालेली मोटार संरक्षक कठड्यापासून काही अंतरावर असलेल्या झाडात अडकली. अन्यथा तीन - चारशे फूट खोल दरीत ती कोसळली असती. गाडीतील सर्वजण सुरक्षित आहेत.

पाचगणीत स्थायिक असलेले पुण्यातील कुलीन ठक्कर व त्यांचे कुटुंबीय आज काही कामानिमित्त मोटारीतून (एमएच १२ ओटी ६६७२) वाईला आले होते. काम संपवून दुपारी पसरणी घाटातून पाचगणीला जाताना सोळा नंबर स्टॉपजवळ मुसळधार पाऊस आणि घाटातील धुक्यामुळे वाहन चालकाला रस्त्यावरील वळण लक्षात आले नाही. त्यामुळे मोटार संरक्षक कठड्यावर चढून दरीच्या बाजूला घुसली आणि काही फूट अंतरावर झाडाला अडकली. त्या ठिकाणी हे झाड नसते, तर मोटार तीन-चारशे फूट खाली दरीत कोसळली असती.

आयुष्याचा धागा होता मजबुत 

या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मोटारीचे किरकोळ नुकसान झाले. मोटारीत एक पुरुष व दोन महिला होत्या. आयुष्याचा धागा मजबुत होता म्हणूनच गाडीतील सर्वजण बालंबाल बचावले. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी तात्काळ पसरणी घाटाकडे धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने मोटार बाहेर काढण्यात आली. अपघाताची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या