दुसऱ्या हप्त्यापोटी विनाकपात एकूण १४.६३ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग
Satara News : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा २०२०-२०२१ चा गळीत हंगाम वैशिष्ट्यपूर्ण व यशस्वीपणे पार पडला. या हंगामात झालेले एकूण गाळप ७ लाख ३१ हजार ६६९ मे.टन विचारात घेऊन दुसNया हप्त्यापोटी प्रति मे.टन २०० रूपयेप्रमाणे (विनाकपात) होणारी एकूण रक्कम १४ कोटी ६३ लक्ष ३३ हजार ९५२ रूपये आज संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
सध्या पावसाळा सुरू झाला असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण विचारात घेता शेती मशागत, बी-बियाणे, रासायनिक खत खरेदी इत्यादीसाठीची रक्कम शेतकऱ्यांच्या वेळीच उपयोगी पडावी यासाठी एफआरपीतील उर्वरित देय रक्कम प्रति मे.टन ४४३ रूपयेपैकी प्रति मे.टन २०० रूपयेप्रमाणे दुसरा अॅडव्हान्स हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा
या हंगामामध्ये कारखान्याने ७ लाख ३१ हजार ६६९ मे.टन ऊसाचे गाळप करून ८ लाख ७२ हजार ६६० क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून सरासरी साखर उतारा १२.८२ टक्के इतका प्राप्त झाला. या गाळप हंगामाची वैशिष्टये म्हणजे या हंगामात निघालेला सरासरी साखर उतारा हा जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा आहे. तसेच या हंगामात झालेले एकूण ऊस गाळप कारखान्याच्या इतिहासातील सर्वाधिक व उच्चांकी गाळप आहे. तसेच शेतकऱ्यांच्या गाळपास येणाऱ्या ऊसाला दर १० दिवसांप्रमाणे ऊसाचे बील अदा करणारा अजिंक्यतारा कारखाना हा महाराष्ट्रात पहिला कारखाना आहे.
या हंगामाकरिता केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या एफआरपी सूत्रानुसार आपल्या कारखान्याची एफआरपी प्रति मे.टन ३०४३ रूपये इतकी निघालेली असून चालू सिझनमध्ये गाळपास आलेल्या ऊसाला पहिला अॅडव्हान्स हप्ता प्रति मे.टन २६०० रूपयेप्रमाणे ऊसाचे पेमेंट वेळेतच अदा करण्यात आलेले आहे. सिझनमध्ये असे एकूण १९० कोटी २३ लक्ष ४२ हजार रूपये इतके पेमेंट अदा करण्यात आलेले आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हाईस चेअरमन विश्वास शेडगे, संचालक रामचंद्र जगदाळे (भाऊ), राजाराम जाधव, यशवंतराव साळुखे, इंद्रजित नलवडे व कार्यकारी संचालक संजीव देसाई हे उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या