मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी अमोल आवळे यांच्या नेतृत्वाखाली लाँगमार्च
Satara News : बहुजनांना पहिले आरक्षण देणारे राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शिवसेना फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघ क्षेत्र प्रमुख अमोल आवळे यांच्या नेतृत्वाखाली मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी मराठ्यांची राजधानी सातारा ते राजभवन (मुंबई) या पदयात्रेला आज सुरूवात झाली.
जवळपास तीनशे किलोमीटर पायी जावून राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्याच्या या मोहिमेचा शुभारंभ अमोल आवळे यांनी सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केला.
मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारित
यादरम्यान आवळे यांनी पत्रकारांशी संवाद साधून या पदयात्रेच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात 'एक मराठा लाख मराठा' असा नारा देत विराट असे ५८ मोर्चे निघाले. आरक्षणाच्या या लढ्यात अनेक तरुणांनी आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारले. मात्र, केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्ग निघू शकतो असे न्यायालयाने सूचित केले होते. हा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
२६ जुलै १९०२ रोजी राजर्षि शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. देशातील पहिले आरक्षण राजर्षि शाहू महाराजांनी दिले. त्याचबरोबर त्यांनी बहुजनांना शिक्षणाची दारे खुली केली.११९ वर्षांपूर्वी हा बहुजनांसाठी निर्णय घेतला होता. आता मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा होणे गरजेचे आहे. म्हणून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे वेंâद्र सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठीच मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा येथून राजभवनपर्यंत ही पदयात्रा आयोजित केली आहे, असे त्यांनी सांगितले.
भावना पोहोचवण्यासाठी पदयात्रा
त्याचप्रमाणे ओबीसींचे राजकीय आरक्षण थांबवण्यात आले आहे. यामध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला प्रायोगिक जनगणनेची माहिती द्यायला हवी होती. त्या आधारावर, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होणे गरजेचे आहे. तसेच २०१७ पासून ओबीसी, एससी आणि इतर समाजाच्या नोकNयांमधील बढत्या, पदोन्नत्या थांबवण्यात आल्या आहेत. त्या बढत्या मिळाव्यात अशा विविध मागण्यांसाठीदेखील ही पदयात्रा आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या माध्यमातून निवेदन देऊन पंतप्रधानांपर्यंत राज्यातील या तीन समाजाच्या आरक्षणासंदर्भातील भावना व संदेश या पदयात्रेच्या माध्यमातून पोहचवण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
या पदयात्रेत अमोल आवळे, भाऊसाहेब वाघ, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते जयेंद्र लेंभे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हमीदभाई पठाण, भाजपचे नितीन चव्हाण, आरपीआयचे किशोर सोनवणे आणि शिवसेनेचे दत्ता जाधव या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या