काही दिवसांपासून ढेपाळलेली लसीकरण मोहीम पुन्हा एकदा गती पकडणार
Satara News : सातारा जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात सर्वाधिक सुमारे १२ हजार कोविशिल्ड लसीचे डोस गुरुवारी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून धीम्या गतीने सुरु असलेली लसीकरण मोहीम पुन्हा वेग घेणार आहे. जिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात लसींचे वाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम दि. १६ मार्चपासून सुुरु झाली. प्रारंभी लसीचे डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने एकाच दिवसात ३७ हजाराहून अधिक लसीकरण झाले होते. मात्र मागील काही दिवसांत जिल्ह्याला लसीचे अल्प प्रमाणात डोस उपलब्ध झाल्याने लसीकरण मोहिमेला खीळ बसली होती. मात्र आता लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने मोहिमेला वेग येणार आहे. लसीकरण सुरु झाल्यापासून आतापर्यंत सर्वाधिक ५० हजार लस जिल्ह्याला उपलब्ध झाली होती. केंद्राकडून राज्याला कोविशिल्डचे १२ लाख लसीचे डोस उपलब्ध झाल्याने गुरुवारी जिल्ह्याला लसीचे डोस मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत.
सातारा लसीकरणात राज्यात तिसरा
सातारा जिल्हा लसीकरणात राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. लसीची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत आहे. जिल्ह्याला जास्तीत जास्त लसीचा पुरवठा होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ लाख ३३ हजार लसीकरण झाले असून लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्यास जिल्ह्यातील लसीकरण मोहीम आणखी गती घेईल असे नोडल अधिकारी लसीकरण विभाग डॉ. प्रमोद शिर्के यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या