Satara News : पावसाळ्याच्या प्रारंभीच धरणांना मोठा 'जललाभ'


कोयना, उरमोडीतून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Satara News : सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार कायमच आहे. पण कालच्या तुलनेत जोर काहीसा कमी झाला आहे. कालच्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात रस्ते, पूल यासारख्या सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचवेळी जिल्ह्याच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी पाण्याच्या जोरदार प्रवाहाने शेतीची मोठ्या प्रमाणात धूप झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या प्रारंभीच धरणांना मोठा 'जललाभ' झाल्याने कोयना, उरमोडी धरणांमधून अल्प का असेना विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सतर्कतेचा

सातारा, कराड, पाटण, जावली तसेच महाबळेश्वर तालुक्यांसह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम आहे. पाटण तालुक्यातील केरा नदीच्या खोऱ्यात ढगफुटीसारखा तुफान पाऊस झाल्याने नदीकाठाने महापुराचा ट्रेलर अनुभवला. त्याचप्रमाणे या तालुक्यातील ढेबेवाडी, तारळे, चाफळ खोऱ्यांमध्येही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. या पावसाने चाफळवरून दाढोलीमार्गे सडावाघापूर, पाटण मार्गावरील दाढोली घाटातील रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

जिल्ह्यात सर्वदूर पर्जन्यवृष्टी

जिल्ह्यात सकाळी १० वाजेपर्यंत व वंâसात आजअखेर झालेला तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये याप्रमाणे : सातारा ४१.४ (२०१.९), जावली ५७.१ (३०४.५), पाटण ३१.९ (२५१.५), कराड २८.१ (२३३.७), कोरेगाव २९.२ (१३५.८), खटाव ११.० (९०.९), माण २.७ (५९.९), फलटण  ५.५ (६९.९), खंडाळा १३.५ (९१.२), वाई ३९.९ (१९५.४), महाबळेश्वर ७३.९ (५६३.२) मिलीमीटर.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात कोयनानगरला १४२, नवजाला १२२ व महाबळेश्वरला १२६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात प्रतिसेकंद ४९ हजार ६०४ क्युसेक पाण्याची आवक होत असून आज सकाळी धरण पायथा विद्युतगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातील पाणीसाठा ३५.१३ टीएमसीपर्यंत गेला आहे. पाणीसाठ्यात चोवीस तासात साडेतीन टीएमसीची वाढ झाली आहे.


कास तलावही झाला ओव्हरफ्लो

त्याचप्रमाणे सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव ओव्हरफ्लो झाल्याने हे पाणी उरमोडी धरणात येऊ लागले आहे. उरमोडीतील पाण्याची आवक वाढल्याने आज धरणाचे चारही वक्र दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून धरणातून १९८६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाऊस व धरणातून सोडल्या जात असलेल्या पाण्यामुळे कोयना - कृष्णा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या