एकट्या सातारा तालुक्यात ११ जण दगावले; तिसऱ्या लाटेचीही टांगती तलवार
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८२० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २७ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
दरम्यान, आजच्या मृतांमध्ये सर्वाधिक ११ मृत्यू एकट्या सातारा तालुक्यातच झाले असल्याने या ठिकाणचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यातच प्रशासनाकडून तिसऱ्या लाटेचे सूतोवाच केले जात असल्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. तथापि, कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असून जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हिटी रेट ७ टक्केच्या आसपास आला आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ५४ (८२२८), कराड २०५ (२५१९७), खंडाळा ३७ (११३७३), खटाव ६१ (१८५४१), कोरेगाव ८४ (१५९७०), माण ५६ (१२५५४), महाबळेश्वर ८ (४२०५), पाटण ३९ (७८५२), फलटण ४३ (२७७०७), सातारा १८८ (३८५४९), वाई ४३ (१२२६२) व इतर २ (१२१२) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ८३ हजार ६५५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ० (१८५), कराड २ (७३९), खंडाळा ० (१४६), खटाव ५ (४६२), कोरेगाव १ (३६६), माण २ (२४९), महाबळेश्वर ० (४४), पाटण ४ (१८०), फलटण २ (२७६), सातारा ११ (११७८), वाई ० (३२२) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४१४७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात ९३८ जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात आज दिवसभरात ९३८ जण कोरोनातून खडखडीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजअखेर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ लाख ७१ हजार ५१४ इतकी झाली असून सध्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्याही साडेआठ हजारच्या खाली आली आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमूने - ९४९७७७
- एकूण बाधित - १८३६५५
- घरी सोडण्यात आलेले - १७१५१४
- मृत्यू - ४१४७
- उपचारार्थ रुग्ण - ८३८६
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या