Satara News : ‘स्टॅण्ड अप इंडिया’तून ‘मार्जिन मनी’ योजना सुरू


अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांना लाभ घेण्याचे आवाहन
 

Satara News : सामाजिक न्याय विभागातर्फे केंद्र शासनाच्या स्टॅण्ड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना कार्यान्वित झालेली आहे. या योजनेंतर्गत सन २०२०-२१ मध्ये सातारा जिल्ह्यात एकूण १२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी परिपूर्ण १० अर्ज मंजूर झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या स्टॅण्ड अप इंडिया योजनेंतर्गत उद्योग करु इच्छिणाऱ्या अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील नव उद्योजकांना भराव्या लागणऱ्या २५ टक्के हिश्श्याच्या रकमेपैकी १५ टक्के रक्कम सामाजिक न्याय विभागामार्फत मार्जिन मनी म्हणून देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नव उद्योजकांना केवळ १० टक्के स्वहिस्सा भरावा लागणार आहे. 

अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील नव उद्योजकांनी मार्जिन मनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या