Satara News : डीसीपीएसच्या पावत्यांचा प्रश्न मार्गी लावणार


वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणीचा प्रश्न सोडवल्याबद्दल सत्कारप्रसंगी जगदाळेंची ग्वाही
 

Satara News : डीसीपीएस धारक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असून डीसीपीएस योजनेच्या हिशोब पावत्यांचा प्रश्नही लवकरच मार्गी लावला जाईल, असे आश्वासन सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी दिले.

७४७ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व २०८९ शिक्षकांच्या निवडश्रेणीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा साताराच्या वतीने जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना काळातही राज्यात सातारा जिल्हा शैक्षणिक कार्यात अग्रेसर असल्याबद्दल सभापती जगदाळे यांनी शिक्षकांचे कौतुक केले.

विविध विषयांवर सविस्तर चर्चा

अधिकृत डीसीपीएस हिशोब पावत्या मिळाव्यात, हिशोब पावत्यांमधील त्रुटींची पूर्तता व्हावी, एनपीएस योजनेबाबत सविस्तर माहिती मिळावी, मृत बांधवांच्या वारसांना हिशोब पावत्यानुसार रक्कम मिळावी, आंतरजिल्हा बदलीतील बांधवाना हिशोब पावत्या एकत्रित मिळाव्यात, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभाग, अध्यापक विद्यालयातील बांधवांच्या हिशोब पावत्या लवकरात लवकर मिळाव्यात, वरिष्ठ वेतन श्रेणी आदेशातील त्रुटींची पूर्तता करण्यात यावी, मृत कर्मचारी बांधवांच्या सानुग्रह अनुदानाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, विज्ञान विषय पदवीधर शिक्षकांचा प्रश्न सोडवण्यात यावा, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा हप्ता रोखीने १ जुलै रोजी मिळावा, शाळातील उपस्थिती ५० टक्के असावी या विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

सहकार्याबद्दल संघटनेच्या वतीने आभार

याबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रवीण सावंत, कनिष्ठ प्रशासन अधिकारी दयानंद सावंत, वरिष्ठ सहाय्यक भालचंद्र शिंदे तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या सहकार्याबद्दल संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, सरचिटणीस अविनाश कर्पे, जिल्हा पदाधिकारी तुषार घाडगे, कराड तालुकाध्यक्ष गणेश चव्हाण, श्रीकांत बाबर, रामचंद्र उमाटे, विलास घावटे आदी उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या