Satara News : मतदानावेळी दिसणारा कळवळा संकटकाळात गायब


जनता त्रस्त आणि नेते बैठकांमध्ये व्यस्त; हेमंत पाटील यांनी व्यक्त केली खंत

Satara News : लोकप्रतिनिधी मतदानाच्यावेळी जसे लोकांविषयी कळवळा दाखवत फिरत असतात तसे आता संकटकाळात फिरताता दिसत नाहीत, त्यांच्याकडून मदत होताना दिसत नाही. ते फक्त शासकीय बैठकांमध्ये मग्न असल्याचे पहायला मिळते, अशी खंत इंडिया अगेस्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचेही मतदार संघातील मतदारांकडे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की निवडणुकीच्या वेळी लोकप्रतिनिधी ज्या तिडकीने लोकांच्या दारात जात असतात, लोकांना आर्जव करत असतात. निवडून दिलेल्या नेत्यांकडून त्या लोकांच्या अपेक्षा असतात. मात्र लोकप्रतिनिधींकडून या अपेक्षा फोल ठरु लागल्या आहेत. जगात कोरोना महामारीचा विळखा पडलेला आहे. त्या विळख्यातून सुटण्यासाठी प्रत्येकजण प्रार्थना करतो आहे. प्रयत्न करतो आहे. अशात संकटातून सुटण्यासाठी प्रत्येकाला मदतीची गरज आहे. गावोगावी हेच चित्र निर्माण झाले आहे.

... अन्यथा लोक जागा दाखवतील 

वास्तविक कोरोना संकटकाळात लोकप्रतिनिधींनी गाव पातळीवर जावून आधार देणे गरजेचे आहे. लोकांच्या दारात जावून त्यांना मदत करणे अपेक्षित आहे. परंतु असे होताना दिसत नाही. निवडून गेल्यानंतर लोकप्रतिनिधींचे मतदारांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा अनुभव सध्या येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी भान ठेवून काम करावे. अन्यथा त्यांना मतदार जागा दाखवतील, अशी परखड प्रतिक्रिया हेमंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या