Satara News : तुफान पावसाने दाढोली घाटातील रस्ता खचला

वाहतूक केली बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे वाहनधारकांना आवाहन

Satara News : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तुफान पर्जन्यवृष्टीचा घाटमार्गांना फटका बसला आहे. चाफळवरुन दाढोलीमार्गे सडावाघापूर, पाटणला जाणाऱ्या मार्गावरील रस्ता खचला आहे. घाटमार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हा रस्ता दुचाकी व चारचाकी वाहनांकरिता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

चाफळ व उंब्रज परिसरातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी व पर्यायी मार्गाचा अवलंब करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या