Satara News : कबुतरे मारल्याच्या कारणावरुन बेदम मारहाण


कोडोली येथील प्रकार; सातारा शहर पोलिसात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल
 

Satara News : सातारा शहरानजीक कोडोली येथे कबुतरे मारल्याच्या कारणावरुन एकाला दांडके व कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश सुरेश कीर्तिकुडाव, अक्षय बबन कीर्तिकुडाव, स्वप्नील पोपट गायकवाड, शुभम सुरेश गायकवाड, जीवन जगन्नाथ गायकवाड, नवीन गायकवाड (सर्व रा. कोडोली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अनिकेत वसंत गायकवाड (वय २९) यांनी फिर्याद दिली आहे. कोडोली येथे भानुदास कीर्तिकुडाव यांच्या किराणा मालाच्या दुकानासमोर ते थांबले होते. यावेळी कबुतरे का मारली असे म्हणत महेशने हनुवटीवर कोयता मारला. अक्षयने भानुदास कीर्तिकुडाव यांच्या गालावर दांडके मारले. स्वप्नीलने जमिनीवर पाडून लाथा - बुक्क्यांनी मारहाण केली, तसेच पुतण्यास का मारले असे विचारले असता संशयितांनी त्यांनाही मारहाण केल्याचे अनिकेत याने फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार सुतार तपास करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या