कोरोनाकाळात अनेकांसाठी आधारवड बनण्याचे कार्य प्रेरणादायी : प्रा. बानुगडे - पाटील
Satara News : पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवले जात असलेले अनाथ मुलांना दत्तक घेणे, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था तसेच नव्याने स्थापन करण्यात आलेले वधू - वर सूचक केंद्र यासारखे विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत. कोरोनासारख्या महामारीच्या काळात अनेकांचा आधारवड बनण्याचे प्रतिष्ठानचे काम प्रेरणादायी असल्याचे उद्गार शिवसेना उपनेते सातारा - सांगली जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे - पाटील यांनी काढले. तर्फे
निगडी (ता. कराड) येथील पाटील प्रतिष्ठानकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतापसिंहनगर (सातारा) येथील गोरगरिबांना मोफत धान्य व किराणा मालाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खेड ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते किशोर सपकाळ व पाटील प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
समाजकार्याचा वसा सुरूच राहणार
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण या विचारधारेस अनुसरून पाटील प्रतिष्ठान कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकीतून सुरू असलेल्या समाजकार्याचा वसा व वारसा यापुढेही अखंडपणे सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयवंत पाटील यांनी यावेळी केले.
जयवंत पाटील हे सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. त्यांच्या समाजकार्याचा वसा आणि वारसा असाच अखंडितपणे तेवत राहावा, असे राष्ट्रवादी कल्याण - डोंबिवली जिल्हा संपर्कप्रमुख अक्षय भोसले म्हणाले. माणसाने माणसाची रीत जाणावी या शब्दाचा अर्थ म्हणजे जयवंत पाटील. त्यांच्या अन्यधान्य वाटप, अनाथ मुले दत्तक योजना, गरीब गरजूंना शैक्षणिक मदत, गरजू कुटुंबांना मदतीचा हात या कार्याबद्दल एक सातारकर म्हणून आपल्याला अभिमान असल्याचे ते म्हणाले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या