Satara News : हेळगाव येथे साकारणार भव्य क्रीडा संकुल


१.११ कोटीचा निधी उपलब्ध; ग्रामीण खेळाडूंना भवितव्य घडवण्याची संधी

Satara News : शासनाच्या क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत हेळगाव (ता. कराड) येथे भव्य असे प्रेक्षागृह उभारण्यात येणार आहे. या योजनेतून ९० लाख व जिल्हा क्रीडा खात्याकडून २१ लाख रुपये असे मिळून १.११ कोटी रुपयांची क्रीडा संकुलाची भव्य वास्तू हेळगावकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. ज्यामध्ये खो-खो, कबड्डी, कुस्ती, बॅडमिंटन, बुद्धिबळ, बास्केट बॉल, मॅटवरील कुस्ती अशा अनेक क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण घेता येणार आहे.

राज्याचे सहकार मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्याकडून ओपन जिम, वॉल कंपाऊंड आणि जमीन सपाटीकरण यासाठीही निधी उपलब्ध होणार आहे. या क्रीडा संकुलनामुळे हेळगाव - पाडळीसारख्या ग्रामीण भागातील सर्व वयोगटातील मुलामुलींना राज्य आणि देशपातळीवर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उज्ज्वल भवितव्य घडवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

४२ गुंठे जागा उपलब्ध

हेळगावच्या उत्तरेस कराड - कोरेगाव रस्त्यालगत बिरोबाचा माळ या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून वापरात नसलेली परंतु गावच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी असलेली ४२ गुंठे जागा येथील सिद्धिविनायक मंडळ (ट्रस्ट) यांच्या नावावर होती. परंतु आपल्या गावच्या सार्वजनिक विकासाचा आणि भावी पिढीच्या भवितव्याचा विचार करून ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे आणि इतर संचालकांनी निर्णय घेऊन ही जागा ग्रामपंचायतीच्या नावावर करून दिली. या ठिकाणी उभारली जाणार असलेली ही वास्तू गावच्या लौकिकात भर पाडणारी ठरणार आहे.

या कामासाठी कागदपत्रांची पूर्तता तसेच मंत्रीमहोदय व मंत्रालयापर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी अशोक संकपाळ, सरपंच शारदाताई जाधव, उपसरपंच संजय सूर्यवंशी, माजी सरपंच बाळकृष्ण जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे, माजी अध्यक्ष श्रीमंत सूर्यवंशी तसेच अशोक चव्हाण, सदाशिव पवार, उद्योजक मिलिंद पाटील, शामराव सूर्यवंशी, कौस्तुभ सूर्यवंशी, विक्रम कुंभार यांनी प्रयत्न केले आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या