ग्रामपंचायत शिपायाचा ‘पराक्रम’; पन्नासहून अधिक ग्रामस्थांना गॅस्ट्रोसदृश आजाराची बाधा
Satara News : ग्रामपंचायतीच्या शिपायाने दारूच्या नशेत गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत टीसीएल पावडरचे अख्खे पोतेच रिकामे केल्याची धक्कादायक घटना जावली तालुक्यातील सरताळे येथे घडली. यामुळे गावातील पन्नासहून अधिक ग्रामस्थांना दूषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो सदृश उलट्या जुलाबाची बाधा झाली असून त्यांच्यावर वाई, पाचवड, सातारा या ठिकाणी उपचार सुरु आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
सरताळे येथील ग्रामपंचायतीच्या शिपायाने दारुच्या नशेत विहिरीत एक किलो टीसीएल पावडर टाकण्याऐवजी संपूर्ण पिशवीच विहिरीमध्ये टाकली. आज सकाळी नियमितपणे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेतून घराघरात हे पिण्याचे पाणी पोहचले. हे पाणी पिल्याने गावातील पन्नासवर ग्रामस्थांना गॅस्ट्रो सदृश उलट्या जुलाब आजाराची बाधा झाली. काहींना जुलाब तर काहींना उलट्या सुरू झाल्या. यासंदर्भात तपासणी केली असता हा सर्व प्रकार दूषित पाणी पिल्याने झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
ग्रामसेवकाबाबत संतप्त प्रतिक्रिया
त्रास झालेल्या ग्रामस्थांवर वाई, पाचवड आणि सातारा येथील रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हा सर्व प्रकार ग्रामसेवकाच्या बेजबाबदार वृत्तीमुळे घडला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटू लागल्या आहेत. याबाबत जावलीचे गटविकास अधिकारी सतीश बध्ये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी आणि बुधवारी पहाटे असे दोन वेळा टीसीएल पावडर संबंधित गावच्या विहिरीत शिपायाकडून टाकण्यात आले. बुधवारी सकाळच्या पाणीपुरवठ्यामध्ये हे पाणी वापरात आल्याने काही नागरिकांना गॅस्ट्रो सदृश आजाराची लागण झाली आहे. यातील सर्वांची प्रकृती व्यवस्थित असून एका ग्रामस्थाची प्रकृती नाजूक असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घर ते घर तपासणी मोहीम
विहिरीतील सर्व पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. गावामध्ये आरोग्य विभागाकडून घर ते घर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये आणखी कोणाला लागण होऊ नये यादृष्टीने दक्षता घेत आहोत .गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा सुरळीत होईल. ग्रामपंचायतीच्या शिपायावर कारवाई करत आहोत असे त्यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या