Satara News : कृष्णाबाई चोरगे यांच्या स्मरणार्थ किटचे वाटप


साताऱ्यात हॉकर्स संघटनेच्या १०० सभासदांना कर्तव्य भावनेतून केली मदत

Satara News : सातारा येथील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांच्या मातोश्री कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ ट्रस्टच्या माध्यमातून आज हॉकर्स संघटनेच्या १०० सभासदांना कर्तव्य भावनेतून धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

गेली अनेक वर्षे राजेंद्र चोरगे हे ट्रस्टच्या माध्यमातून रिक्षाचालक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, हॉकर्स यांमधील गरजू लोकांना निस्वार्थपणे मदतीचा हात देत आले आहेत. नुकताच त्यांना मातृशोक झाला. त्यानिमित्ताने आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा दिनाचे औचित्य साधून चोरगे यांनी मातोश्रींच्या स्मरणार्थ गरजू, गरीब लोकांना धान्याच्या किटचे वाटप केले. याहीवर्षी कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर ज्यांच्या हाताला लॉकडाऊन काळात काम मिळाले नाही, अशा हॉकर्स संघटनेच्या १०० सभासदांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. चोरगे यांच्या या दातृत्वाबद्दल लाभार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

अनेक मान्यवरांची उपस्थिती

यावेळी राजेंद्र चोरगे, सचिव संजय कदम, जगदीश खंडेलवाल, उदय गुजर, अर्जुन चोरगे, जगदीप शिंदे, हरिदास साळुंखे, संतोष शेंडे, संजय केंडे यांच्या हस्ते धान्य किटचे वाटप केले. यावेळी हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार, जिल्हाध्यक्ष सादिक पैलवान, कार्याध्यक्ष संदीप माने, देवदूत फौंडेशनचे अध्यक्ष सागर भोगांवकर, बालाजी ट्रस्ट, हॉकर्स संघटना, देवदूत फौंडेशनचे पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी सहकार्याने हा कार्यक्रम झाला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या