Satara News : संयुक्त विद्यार्थी संघटनेचे सहकारमंत्र्यांना निवेदन


फी माफीप्रश्नी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करण्याची मागणी
 

Satara News : महाविद्यालयातील अनावश्यक विभागांची फी रद्द करण्यासाठी आणि ट्यूशन फीमध्ये ५० टक्के सवलत मिळण्यासाठी संयुक्त विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी गेले १० महिने लढा देत आहेत. याबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करावा यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची त्यांच्या कराड येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले.

कोरोना महामारीमुळे जवळपास वर्षभरापासून टाळेबंदीची परिस्थिती ओढवलेली आहे. अशा परिस्थितीमुळे बहुतांश पालकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत असून अत्यावश्यक वगळता सर्व व्यवसायदेखील ठप्प झाले आहेत. अशी परिस्थिती असतानासुद्धा काही महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०१९ - २०च्या महाविद्यालयीन शुल्क रचनेमध्ये वाढ करीत सुधारित शुल्करचना जाहीर करून त्यानुसार रक्कम वसूल केली आहे आणि करत आहेत. 

लाभ नसलेल्या विभागाचेही शुल्क

या रचनेमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष उपभोगत नसलेल्या विभागाच्या शुल्कांचाही समावेश आहे. अनावश्यक साधारणत: डेव्हलपमेंट फी, लायब्ररी फी, स्टेशनरी आणि जनरल फी, जिमखाना फी, स्पोर्टस् फी, गॅदरिंग फी, युथ फेस्टिवल फी, एलिजिबिलिटी फी, इंटरनेट फी, रोग निर्मुलन योजना आणि इतर कार्यक्रमांच्या फी इत्यादी शुल्काचा यामध्ये समावेश होतो.

समिती होण्याआधी बैठक व्हावी

शैक्षणिक शुल्क ठरवण्यासाठी उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश यांची समिती गठीत करण्याआधी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत संघटनेची बैठक व्हावी ही संघटनेची प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संकेत कचरे, कराड तालुका अध्यक्ष कोमल चव्हाण, साहिल तांबोळी, डॉ. सुमय्या तांबोळी, वैष्णव पाटील, समर्थ सूर्यवंशी, धैर्यशील कदम, अस्मिता जाधव आदी उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या