Satara News : कॉ. अरविंद मुळ्ये यांचे वृध्दापकाळाने निधन


सातारा येथील विमा कामगार संघटनेचे संस्थापक, लढवय्ये नेतृत्व
 हरपले

Satara News : सातारा येथील विमा कामगार संघटनेचे संस्थापक, सक्रिय कार्यकर्ते व नेते कॉ. अरविंद नारायण मुळ्ये (वय ८३) यांचे आज पहाटे चिपळूणकर बाग (सातारा) येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी संगममाहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा रंगकर्मी व पत्रकार राजीव मुळ्ये, विवाहित मुलगी रेवा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Lal Salaam... Lal Salaam

'कॉ. अरविंद मुळ्ये को लाल सलाम', 'कॉ. अरविंद मुळ्ये अमर रहे' अशा जयघोषात कॉ. अरविंद मुळ्ये यांना अखेरचा निरोप देण्यात आला. संगममाहुली येथे सुजित शेख व विजय मांडके यांनी कॉ. अरविंद मुळ्ये यांच्या सामाजिक कार्यासंदर्भात तसेच विमा कामगार संघटनेच्या कार्यासंदर्भात माहिती सांगून आदरांजली वाहिली.

परिश्रमपूर्वक संघटनेची बांधणी 

कॉ. मुळ्ये यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने अतिशय परिश्रमपूर्वक वीमा कामगार संघटनेची बांधणी केली होती. विमा कर्मचाऱ्यांची डाव्या विचाराबरोबर जुळणी व्हावी यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असत. त्यांच्या निधनाबद्दल रंगभूमी, पत्रकारिता, कामगार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. कामगार चळवळीतील अभ्यासू, चिंतनशील, समन्वयवादी नेतृत्व हरपल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या