Satara News : जिल्ह्यातील निवृत्त शिक्षकांचा प्रलंबित प्रश्न सुटला


निवड वेतनश्रेणी मंजूर; ७४७ शिक्षकांनाही मिळाले वरिष्ठ वेतनश्रेणीचे गिफ्ट

Satara News : सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील निवृत्त शिक्षकांच्या निवड वेतनश्रेणीचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. कोरोनाच्या कठीण काळात जिल्ह्यातील निवड वेतनश्रेणी मंजूर झाल्याने २ हजार ८९ सेवानिवृत्त शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर ७४७ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मिळाल्याने त्यांनाही गिफ्ट मिळाले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी सेवानिवृत्त वेतनश्रेणीच्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर आदी उपस्थित होते.

विशेष समितीच्या अहवालावर निर्णय 

या निर्णयासाठी कार्यप्रणाली ठरविताना उपशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार गटशिक्षणाधिकारी आणि चार शिक्षण विस्तार अधिकारी यांचा समावेश असलेली विशेष समिती जिल्हा परिषदेने स्थापन केली होती. त्यांनी या प्रकरणाचा अभ्यास करुन अहवाल दिला. त्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रशासकीय विभाग व पदाधिकारी यांनीही विशेष प्रयत्न केले. या अहवालानुसार ऑक्टोबर २०१७ ते मार्च २०२० अखेरच्या ७४७ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर झाली आहे. 

१ जानेवारी १९८६ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत प्रलंबित असणाऱ्या एकूण २ हजार ८९ शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर झाली आहे. वर्षानुवर्षे अथक सेवा केलेल्या आणि कित्येक वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शेकडो शिक्षकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. शिवाय या निर्णयामुळे त्यांना संबधित रकमेचा फरकदेखील प्राप्त होणार आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या