आले बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक, शिवार फेरी व घोंगडी बैठकांचे आयोजन
Satara News : कोरेगाव तालुक्यातील मौजे कोलवडी, परतवडी परिसरात 'सोयाबीन बियाणे घरचे घरी' कार्यक्रमांतर्गत बियाणे विक्री शुभारंभ कार्यक्रमाचे औचित्य साधून आले बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक, शिवार फेरी व घोंगडी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कृषि विभागाने केलेल्या नियोजनातून कोरेगाव तालुक्यात खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. तालुक्यात सोयाबीन व घेवडा पिकांची बियाणे उगवणक्षमता प्रात्यक्षिक, रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक, हुमणी नियंत्रण सापळे, बांधावर खतवाटप योजना, नियंत्रित खत वापर प्रात्यक्षिक, शेतीशाळा, पीक प्रात्यक्षिक, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, फळबाग लागवड योजना व जलशक्ती अभियान या विविध उपक्रमाअंतर्गत कोरेगाव तालुका खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. या अनुषंगाने कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले जात आहे.
योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सोयाबिन बियाणे बीजप्रक्रियेकरिता ५० टक्के ईमिडाक्लोप्रिड, रायझोबियम व स्फ़ुरद जिवाणू संवर्धक वाटप करण्यात आले. बांधावर खत वाटप योजनेअतर्गत एकत्र येऊन गावातील शेतकऱ्यांना आवश्यक खताची मागणी कृषि विभागाकडे करावी. शेतकरी / बचत गटांनी एकत्र आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लाभासोबत वेळेची देखील बचत होत असल्याने तसेच टंचाईच्या काळात घरपोहोच सुविधा मिळत असल्याने बांधावर खत वाटप योजना सर्व शेतकरी बांधवांच्या हिताची असून तालुक्यातील बचत गटांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन कोरेगावचे तालुका कृषि अधिकारी बापूसाहेब शेळके यांनी केले.
मशागतीची कामे प्रगतीपथावर
तालुक्यातील सोयाबीन, घेवडा, वाटाणा, भुईमूग, बाजरी व मका या पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे प्रगतीपथावर असून वेळेवर पावसाचे आगमन झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सोयाबीन व घेवडा पिकाची पेरणी बियाणे उगवणक्षमता चाचणी घेतल्यानंतरच करावी व बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सरपंच व बचत गट अध्यक्ष उमेश दिसले, उपसरपंच बंडू दिसले, प्रीतेश माळी, मंडल कृषि अधिकारी गोविंद शिंगाडे, कृषि पर्यवेक्षक वर्षा बोबडे, कृषि सहाय्यक, परतवडी बचत गटातील शेतकरी तसेच कृषि विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या