Satara News : बाधितांचा आकडा वाढत गेल्यास पुन्हा कडक निर्बंध


काळजी घ्या, कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा - पालकमंत्री बाळासाहेब पाटील
 

Satara News : कोरोना रुग्णवाढीचा आलेख जिल्ह्यात वाढत आहे. हा आलेख असाच वाढत राहिल्यास व बाधितांचा आकडा वाढत गेल्यास पुन्हा कडक निर्बंध लावले जातील. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता काळजी घेऊन कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

राज्यात कोरोनाची लाट थोडीशी ओसरत असताना अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातही शिथिलता दिल्याने लोक पुन्हा बाहेर पडू लागले आहेत. पण गेल्या तीन - चार दिवसांचा कोरोनाचा आलेख पाहता रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. लोकांनी कारणाशिवाय बाहेर पडू नये, तसेच सुरक्षित अंतर ठेवावे, हात स्वच्छ ठेवावेत. मास्कचा वापर करावा. अनेक ठिकाणी मास्क काढून लोक एकमेकांशी बोलतात दिसत आहेत. यातूनच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे लोकांनी शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

खरीप हंगामामुळे दुकानांना सूट 

कोरोना आलेख जिल्ह्यात वाढत आहे. हा आलेख असाच वाढत राहिल्यास जिल्हा ज्या पातळीत आहे, त्यापेक्षा वरच्या पातळीत जावू शकतो. त्या पातळीवर गेल्यावर पुन्हा कडक निर्बंध लावले जातील. सध्या खरीप हंगाम सुरू असून त्यासाठी खते, बी - बियाणांची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. या व्यावसायिकांनी व दुकानदारांनी सध्या काळजी घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या