दिवसभर चालणार देखभाल - दुरूस्तीचे काम; कुडाळ, करहरमार्गे वाहने धावणार
Satara News : महाबळेश्वर व पाचगणीकडे महाराष्ट्रासह देशभरातून पर्यटक येत असतात. पुणे बाजूकडून येणाNया पर्यटकांची वाट ज्या पसरणी घाटातून जाते, तो पसरणी घाट बुधवार दि. ३० जून रोजी पूर्ण दिवसभर वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांना पाचवड - कुडाळ - करहर या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.
महाबळेश्वर तसेच पाचगणी परिसरात उच्चांकी पाऊस पडत असतो. त्यामुळे महाबळेश्वरला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणूनही संबोधले जाते. अतिपावसामुळे पसरणी घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असतात. डोंगरातून रस्त्यावर वाहत येणाNया पाण्यामुळे रस्त्यात खड्डे पडतात. तसेच संरक्षक कठड्यांचीही पडझड होत असते. घाटातील साखळी क्रमांक ६६ / ०० ते ७० / ०० मधील मोरी व संरक्षक भिंती अतिवृष्टीमुळे पडलेल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला असून त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. मोरीचे व संरक्षक भिंतीचे बांधकाम करून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित व सुव्यवस्थित करण्यासाठी बुधवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत घाटातील वाहतुक पूर्णत: बंद ठेवली जाणार आहे.
पर्यायी मार्गाचा अवलंब करा
घाट बंद राहणार असल्याने वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. महाबळेश्वर, पाचगणीला जाण्यासाठी पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड येथून कुडाळ, करहरमार्गे पाचगणीला पोहोचता येईल. याच मार्गाने महामार्गावरही येता येईल. या मार्गाने जातानाही परिसर निसर्गरम्य आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या