संचारबंदी असताना विनाकारण फिरणाऱ्यांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल
Satara News : कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सायंकाळी पाचनंतर संचारबंदी आदेश लागू असताना सातारा - कास रस्त्यावर यवतेश्वर परिसरात कारमधून व दुचाकीवरुन विनाकारण फिरणाऱ्या बेपर्वा नागरिकांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्थ बोधे (वय २१, रा. सोमवार पेठ, सातारा), पाणिनी सुहास पिटके (वय ३४, रा. संभाजीनगर, सातारा), गौरव नंदकुमार दोशी (वय ३४, रा. विसावा पार्वâ, सातारा), ज्ञानेश नीळवंâठ खलेकर (वय ३४, रा. भवानी पेठ, सातारा), इंद्रजित अंकुश कणसे (वय ३०, रा. पिंपरी, ता. कोरेगाव), योगेश गणेश पवार (वय २७, रा. खिंडवाडी, ता. सातारा), संभाजी यशवंत जाधव (वय ५४, रा. वर्धनगड, ता. खटाव, हल्ली रा. गडकर आळी, सातारा), धनंजय परशुराम अवसरे (वय ४८, रा. गुरुवार पेठ, सातारा), आकाश अतुल शालगर (वय २९, रा. रांगोळे कॉलनी, शाहूपुरी, सातारा), शैलेश करंदीकर (रा. अवधूत चिंतन कॉलनी, शाहूपुरी, सातारा), रोहन जालिंदर पवार (वय २४, रा. विकासनगर, सातारा), ललित बाळासाहेब रसाळ (वय २८, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक विश्वनाथ अंब्राळे यांनी फिर्याद दिली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या