डोंगरी भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीची शंभूराज देसाईंनी केली पाहणी
Satara News : गेल्या दोन - तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे येत्या तीन दिवसांत पंचनामे करुन प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास सादर करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पाटण तालुक्यातील विविध गावांची पाहणी देसाई यांनी केली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. याप्रसंगी पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार योगेश्वर टोणपे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दशरथ काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
एकत्रित प्रस्ताव सादर करा
गेल्या दोन - तीन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे, रस्ते, पूल व शेतीचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्याचे पंचनामे कृषी विभाग, महसुल विभाग व ग्रामसेवक यांनी तात्काळ करुन एकत्रित प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास सादर करावा. प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाच्या निदर्शनास आणला जाईल. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी व अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली दळणवळण व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही देसाई यांनी यावेळी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या