Satara News : दिव्यांगांबाबत राज्य सल्लागार मंडळ होणार स्थापन


अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी १७ जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Satara News : दिव्यांगांबाबत राज्य सल्लागार मंडळाची स्थापना व दिव्यांग संशोधन समिती गठीत करण्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत व नामवंत तज्ञ व्यक्ती, दिव्यांग व दिव्यांगाच्या स्वंयसेवी संस्थाचे प्रतिनिधीत्व करणारे दिव्यांग पदाधिकारी व सदस्य यांची नावे शासनास सादर करावयाची आहेत. 

राज्य सल्लागार मंडळावर अशासकीय सदस्यांकरिता करावयाचा अर्ज ११ जूनपर्यंत उपलब्ध आहे. अर्ज उपलब्ध करुन घेण्यासाठी मालसिंग पवार, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, सातारा यांच्याशी संपर्क साधावा. प्राप्त केलेल्या अर्जातील माहिती भरुन आवश्यक कागदपत्रासह संपूर्ण तीन प्रतीत प्रस्ताव १७ जून रोजी समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हा समाज कलयाण अधिकारी सपना घोळवे यांनी केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या