भारत सरकार आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय राबवणार उपक्रम
Satara News : भारत सरकार आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून इंटिग्रेटेड रोड अॅक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी) हे अँड्रॉईड अॅप राबविण्यात येणार आहे. या अॅपचे मुख्य उद्दिष्ट देशाची रस्ते सुरक्षा वाढवणे हे असून एनआयसी आणि आयआयटी (मद्रास) यांनी संयुक्तपणे यावर काम केले आहे.
आयआरएडी अॅप्लिकेशन अँड्रॉइड असून प्रत्येक अपघातानंतर घटनास्थळी भेट देणारे पोलीस अधिकारी, अंमलदार यांना अपघाताचे छायाचित्र, व्हिडिओ शूटिंग अपलोड करण्याची सोय त्यामध्ये केली आहे. त्यामुळे गुगल लोकेशन क्लिक केल्यामुळे अपघाताचे घटनास्थळ योग्य प्रकारे निश्चित करण्यास मदत होणार आहे.
पोलिसांना एनआयसीतर्फे प्रशिक्षण
जिल्ह्यातील २९ पोलीस ठाण्यातील १०८ अपघाताची नोंद झाली आहे. यासाठी पोलिसांना एनआयसीतर्फे प्रशिक्षण दिले गेले आहे. या अॅपसाठी नोडल अधिकारी म्हणून पोलीस उपनिरिक्षक अंतम खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एनआयसीचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी संजय गुमास्ते यांनी याविषयी माहिती दिली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या