Satara News : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार


फॉलो करत राजस्थानात पोहोचल्यावर कुटुंबियांनी शिवीगाळ करत धमकावले

Satara News : जावली तालुक्यातील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी बाबुलाल डोलाराम चौधरी (सध्या रा. राधिका टॉकीज चौक, सातारा, मूळ रा. राजस्थान) याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, युवतीला वेळोवेळी धमकावून जातीवाचक शिवीगाळ केल्याने युवकाच्या कुटुंबीयांविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे.

बाबुलाल चौधरी, पानीदेवी चौधरी, डोलाराम चौधरी, मोहनलाल चौधरी, भवरीदेवी चौधरी, ओमाराम चौधरी, अशोक चौधरी, मुकेश चौधरी, दिनेश चौधरी (सर्व रा. राजस्थान) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

लग्नाचा तगादा लावल्यानंतर पसार

तक्रारदार युवती सध्या सातारा शहर परिसरात वास्तव्य करत आहे. २०१८ मध्ये तिची व संशयित युवक बाबुलालसोबत ओळख झाली. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी अत्याचार केला. यातून ती युवती पाचवेळा गरोदर राहिली. मात्र युवतीची इच्छा नसताना संशयिताने कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. युवतीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर मात्र संशयित पसार झाला.

शहर पोलिसात गुन्हा दाखल 

युवतीने संशयिताला वेळोवेळी फोन केला. मात्र त्याने फोन उचलला नाही. तसेच नंतर फोन बंद केला. यामुळे युवतीने राजस्थान गाठले. तेथे गेल्यानंतर तिथे तिला युवकाच्या कुटुंबियांनी अपमानास्पद वागणूक देवून जातीवाचक शिवीगाळ केली. फसवणूक झाल्याचे समोर आल्याने अखेर युवतीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या