पुनर्वसनासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन; संपर्क साधण्याचे आवाहन
Satara News : कोरोना महामारीत अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला असेल, तर त्या कुटुंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी एनएसएफडीसी (नवी दिल्ली) यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे.
या योजनेंतर्गत प्रकल्प मूल्य १ लाख ते ५ लाखापर्यंत असणार आहे. एनएसएफडीसी सहभाग ८० टक्के, अनुदान २० टक्के, व्याजदर ६ टक्के व परतफेडीचा कालावधी ६ वर्ष आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (३ लाखापर्यंत), कोविड-१९ मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्युचा दाखला, रेशनकार्ड व वयाचा पुरावा सोबत जोडावा. अर्ज व अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या