सातारच्या जिल्हा आरोग्य अधिकारीपदी अद्याप तरी कोणाची नियुक्ती नाही
Satara News : सातारा जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांची प्रतिनियुक्तीवर रत्नागिरी येथे बदली झाली आहे. मात्र त्यांची बदली करताना त्यांच्या जागी नक्की कोण येणार हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, डॉ. आठल्ये यांनी अद्याप पदभार सोडला नसल्याने जिल्हावासीयांना तूर्त काळजीचे कारण नाही.
मागील दोन वर्षापूर्वी डॉ. अनिरुद्ध आठल्ये सातारला जिल्हा आरोग्य अधिकारीपदी रूजू झाले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक बाबतीत उठावदार कामगिरी केली. विशेष म्हणजे कोरोना काळात डॉ. आठल्ये आणि त्यांच्या टीमने मोठे योगदान दिले. प्रशासन तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याविषयी तक्रारी सुरू असताना सौजन्यशील वागण्यामुळे डॉ. आठल्ये यांचा सर्वांना चांगला अनुभव येत होता.
साताऱ्याशी जिव्हाळ्याचे संबंध
सुरुवातीच्या काळात सुट्टी आणि रजा न घेता त्यांनी काम केले. तसेच आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्यासाठीही डॉ. आठल्ये यांनी सतत पाठपुरावा केला. तसेच कर्मचारी वर्गाच्या अडचणी सोडविण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. डॉ. आठल्ये यांचे पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण सातारा येथेच झाले असून पुढील सर्व शिक्षण त्यांनी सोलापूर येथे पूर्ण केले आहे. सोलापूरमधूनच आरोग्य विभागातील सेवेचा आरंभ केलेल्या डॉ. आठल्ये यांची आजपर्यंत २२ वर्षे सेवा झाली आहे. आता त्यांची रत्नागिरीला प्रतिनियुक्तीवर बदली झाली असली तरी त्यांच्या जागी अजून कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या