Satara News : जिल्हा बँक देणार अपघात विमा संरक्षण


प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत वार्षिक हप्ता बँक स्वतः भरणार

Satara News : सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये लोकांना विमा संरक्षण असणे गरजेचे आहे. यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत पात्र खातेदारांचा वार्षिक हप्ता स्वत: भरून त्यांना अपघात विमा संरक्षण प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्व सेव्हिंग्ज ठेव खातेदारांनी आपल्या शाखेत योजना फॉर्म भरून देवून विमा संरक्षित व्हावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा विचार केला तर आजपर्यंत योजनेत सहभागी झालेल्या खातेदारांची संख्या फार कमी आहे. सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीला विमा संरक्षण असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आपली जिल्हा बँक या योजनांचा ग्राहक, खातेदार यांना फायदा व्हावा यासाठी सदैव प्रयत्नशील असते. या दृष्टीने बँकेने ओरिएन्टल जनरल इन्शुरन्स कंपनीच्या वतीने सुरू असलेल्या 'प्रधानमंत्री सुरक्षा अपघात विमा योजना' या फक्त अपघात कव्हर असणाऱ्या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खातेदारांना त्यांनी अदा केलेला वार्षिक प्रिमियम परत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे आता जिल्हा बँकेच्या खातेदाराला २ लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण प्राप्त होणार आहे, असे विधान परिषदेचे सभापती व बँकेचे संचालक रामराजे नाईक - निंबाळकर यांनी सांगितले.

१० लाखापेक्षा जास्त खातेदारांना  लाभ

सातारा जिल्हा बँकेने ग्राहक हिताला सदैव प्राधान्य दिले आहे. यामुळे बँकेने खातेदारांच्या भविष्याचा वेध घेत उचललेले हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे. या अपघात विमा योजनेचा प्रिमियम बँकेने परतावा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यातील बँकेच्या सुमारे १० लाखापेक्षा जास्त खातेदारांना या योजनेंतर्गत अपघात विमा संरक्षण प्राप्त होणार आहे. आणि दुर्दैवाने खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्यांच्या वारसाला २ लाख रुपये आर्थिक मदत होणार आहे, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री व बँकेचे संचालक बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिली.

फॉर्म भरून देण्याचे आवाहन

वरील योजने अंतर्गत विमा संरक्षण प्राप्त होण्यासाठी खातेदारास बँकेत जावून योजना फॉर्म भरून देणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे जे खातेदार आजवर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी झाले नाहीत त्यांनी आजच आपल्या सातारा जिल्हा बँकेच्या शाखेत जावून योजना फॉर्म भरून द्यावा. तसेच या योजनेव्यतिरिक्त प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, पगारदार खातेदार अपघात विमा योजना या बँकेच्या वतीने सुरु असलेल्या इतर विमा योजनांमध्ये नियमानुसार पात्र खातेदारांनी समाविष्ट होवून आपल्या प्रियजनांचे भविष्य सुरक्षित करावे असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.

याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सर्व संचालक, सरव्यवस्थापकरा राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, बिगरशेती कर्ज विभागाचे व्यवस्थापक वाय. जे. साळुंखे, उपव्यवस्थापक महेश शिंदे, बँकेचे अधिकारी व सेवक उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या