Satara News : 'आरटीई'अंतर्गत थकित रक्कम शाळांना देऊन टाका


खासदार उदयनराजे यांची शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी

Satara News : राज्यातील खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना २५ टक्के राखीव जागांची ठरवून दिलेल्या शुल्काची रक्कम 'आरटीई'अंतर्गत त्वरित वितरित करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना समक्ष भेटून केली आहे. यावेळी या मागणीचे निवेदनही त्यांनी दिले.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सुमारे दीड वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक विधायक निर्णय घेऊन शिक्षण खात्याने कोरोना लढाईतील वाटा उचलला आहे. त्याबद्दल शिक्षण मंत्रालय कौतुकास पात्र आहे. मात्र राज्यातील खासगी इंग्रजी शाळेतील विद्यार्थी संख्येच्या २५ टक्के संख्या एससी, एसटी, अर्थिकदृष्ट्या मागास आदींसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या २५ टक्के विद्याथ्र्यांचे शैक्षणिक शुल्क प्रत्येक शाळेच्या गुणात्मक निकष मूल्यांकनाद्वारे शासन प्रत्येक शाळेला देते. आजपर्यंत २०१८ पर्यंत असे आरटीईचे शुल्क राज्य शासनाने संबंधित शाळांना दिले आहे. त्यानंतर मात्र आजअखेर जवळजवळ तीन वर्षे हे शुल्क वितरित केलेले नाही.

शाळा चालक व पालकांचीही परवड

कोरोनामुळे खासगी इंग्रजी शाळा चालक आणि पालक या दोघांची शिक्षण देणे आणि शिक्षण घेणे याविषयी परवड सुरु आहे. शाळांनी ५० टक्के फी सवलत दिली पाहिजे, अशी पालकांची मागणी आहे. विविध पालक संघ याबाबत आक्रमक होत आहेत. तर संस्थाचालकांना संस्थेचे कर्ज, गुरुजनांसह अन्य व्यक्तींचे पगार भागवणे हे मूलभूत खर्च टाळता आलेले नाहीत. त्यामुळे पुन्हा ५० टक्के फी सवलत देणे जिकिरीचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडे प्रलंबित असलेली आरटीईची थकित रक्कम इंग्रजी शाळांना वितरित करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी रॉबर्ट मोझेस, काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर, विनित पाटील आदी उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या